कु. हिमानी निलेश चचडा विज्ञान शाखेतून तालुक्यातून प्रथम...
यावर्षीही मुलींनीच मारली बाजी :- वाणिज्य शाखेत प्रज्योत तर कला शाखेत समीक्षा अव्वल..
वणीः - सुरज चाटे
सोमवारी दि. 5 मे रोजी दुपारी 12 विचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात यावर्षीही मुलींनी बाजी मारली आहे. वणी पब्लिक स्कूल ज्यु. कॉलेजची कु. हिमानी नीलेश चचडा ही 90.67 टक्के गुण घेत वणीतून विज्ञान शाखेतून प्रथम आली आहे. लोटी महाविद्यालयाचा प्रज्योत विनोद गुंडेवार हा 92 टक्के गुण घेत वाणिज्य शाखेतून तसेच सर्वाधिक गुण घेत तालुक्यातून प्रथम आला आहे. तर लोटी महाविद्यालयाची समीक्षा प्रवीण टोंगे ही 86.83 टक्के गुण घेत कला शाखेतून वणीतून प्रथम आली आहे. याच महाविद्यालयातील विज्ञान शाखेची कु. श्रावणी विजय गव्हाणकर ही 87.83 टक्के गुण घेत कॉलेजमधून प्रथम आली आहे.
वणी पब्लिक ज्यु. कॉलेजमधून विज्ञान शाखेतून वंश राहुल निघोट हा 71 टक्के गुण घेत कॉलेजमधून दुसरा तर अक्षय रणजीत सिंग हा 68.83 टक्के गुण घेत तिसरा आला आहे. वाणिज्य शाखेतून सत्यम शिवदास मिश्रा हा 84.83 टक्के गुण घेत कॉलेजमधून पहिला तर कु. भावना संजय वरारकर ही 83.83 टक्के गुण घेत व युग रुपेश कोचर हा विद्यार्थी 80.17 टक्के गुण घेत कॉलेजमधून तिसरा आला आहे.
लो.टी महाविद्यालयाची विज्ञान शाखेची कु. सुरभी विनोद चोपणे ही 85.33 टक्के गुण घेत कॉलेजमधून दुसरी तर कु. श्रावणी मस्के ही 83 टक्के गुण घेत तिसरी आली आहे. याच महाविद्यालयाचा गणेश भास्कर खैरे हा 80.67 टक्के गुण घेत कला शाखेतून दुसरा तर कु. समृद्धी विजय तिप्रमवार ही 80 टक्के गुण घेत तिसरी आली आहे. वाणिज्य शाखेतून कु. जान्हवी संजय पांडे व फैजान जावेद शेख हे दोघे समान 91.33 टक्के गुण घेत दुसरे आले आहेत. तर कु. अंजली संतोष तमिलवार ही 89.67 टक्के गुण घेत कॉलेजमधून तिसरी आली आहे. एमसीव्हीमध्ये ज्ञानेश्वर राजेश चिकटे हा 68 टक्के गुण घेत पहिला आला आहे.
एसपीएम महाविद्यायाची विज्ञान शाखेची कु. आचल रितेश गोजे ही 82.50 टक्के गुण घेत कॉलेजमधून द्वितीय तर नहर विडूळकर हा 72 टक्के गुण घेत तिसरा आला आहे. याच महाविद्यालयातून कला शाखेतून अनुष्का राजेश बावणे ही 71.50 टक्के गुण घेत कॉलेजमधून प्रथम, तर कु. भूमी अशोक बोरकर ही 70 टक्के गुण घेत दुसरी तर कु. आचल दत्तात्रय राजूरकर ही 68.83 टक्के गुण घेत तिसरी आली आहे. या शाळेतील विज्ञान शाखेतून 94 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील 91 विद्यार्थी पास झालेत. तर कला शाखेतून 113 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील 83 विद्यार्थी पास झालेत.
लॉयन्स ज्यु. कॉलेजची विज्ञान शाखेची कु. अनम सिद्धीकी ही 60 टक्के गुण घेत कॉलेजमधून प्रथम आली. या कॉलेजचा 85.17 टक्के निकाल लागला आहे.
0 Comments