‘अ’ गटात स्वर्णलीला स्कुल तर ‘ब’ गटात पोद्दार स्कूल अव्वल...
वणी : - सुरज चाटे
रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी यांच्या वतीने आयोजित भव्य आंतरशालेय नृत्यस्पर्धा रंगतदार वातावरणात स्वातंत्र्यदिनी पार पडली.
A grand inter-school dance competition organized by the Rotary Club of Black Diamond City was held in a colorful atmosphere on Independence Day.
ताल, लय आणि भावनांचा अप्रतिम संगम घडवून आणणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यकौशल्याने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाला शहरातील नृत्य प्रेमी, शिक्षक व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली होती. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक, लोकनृत्य तसेच आधुनिक नृत्यप्रकारांवर मनमोहक सादरीकरण करून टाळ्यांचा कडकडाट मिळविला.
‘अ’ गटात प्रथम स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय लॉयन्स इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय एसपीएम हायस्कूल यांनी क्रमांक पटकावला. तर ‘ब’ गटात प्रथम पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, द्वितीय मायक्रॉन इंटरनॅशनल स्कूल, तृतीय स्थानी बाल विद्या स्कूल हे आली.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी ,रोख बख्शीश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे प्रदान करण्यात आली. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यां मध्ये देशभक्ति ची भावना वाढ़ते व आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळते तसेच आत्मविश्वास व स्पर्धात्मकता वाढीस लागते, असे मत रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी चे अध्यक्ष लवलेश लाल यानी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबचे पदाधिकारी व सदस्यांनी मोठे योगदान दिले.
0 Comments