ADvt

सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम....



सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम....

संजय खाडे यांचा वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा....

रक्तदान शिबिर, वृद्धाश्रमात साहित्य वाटप, रुग्णांना फळवाटप आणि डीएसके कन्स्ट्रक्शन कार्यालयाचे उद्घाटन....

सत्यभाषा वणी :- शेतकरी व कामगार नेते तथा संजय खाडे यांचा वाढदिवस यंदा सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शनिवार, दि. 23 मे 2026 रोजी वणी येथे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


     सकाळी 10.30 वाजता शेतकरी मंदिर, वणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अपघात, शस्त्रक्रिया तसेच गंभीर आजारांमध्ये रक्ताची सतत आवश्यकता भासत असताना, एका रक्तदात्यामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.


     दुपारच्या सत्रात वणी येथील वृद्धाश्रमात गरजू ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. समाजातील वयोवृद्धांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, याचवेळी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करून मानवतेचा संदेश दिला जाणार आहे.


     दरम्यान, संध्याकाळी 6 वाजता डीएसके कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स या नव्या व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री वसंतरावजी पुरके राहणार आहेत.
     संजय खाडे यांचे चिरंजीव धनंजय खाडे यांच्या नेतृत्वात सुरू होत असलेल्या या नव्या व्यावसायिक उपक्रमामुळे स्थानिक विकासाला चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यासोबत विकासाभिमुख दृष्टी ठेवून हा उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
     या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था तसेच संजय खाडे मित्रपरिवाराचे सदस्य परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments