ADvt

सोशल मिडिया समजून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी समजून घ्या.... प्रसाद खानझोडे...



सोशल मिडिया समजून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी समजून घ्या.... प्रसाद खानझोडे...

सुयश कोचिंग क्लासेस खैरी कडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान....

वणी :- सुरज चाटे

     सुयश कोचिंग क्लासेस खैरीच्या वतीने १७ जून २०२५  रोजी गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. आयोजित कार्यक्रमात देवता अनील पुरी (रा.कोसरा) हिने एच एस सी वाणिज्य शाखेत राळेगाव तालुक्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष वणी येथील लो. टी. म. चे प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे सर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. 
     Suyash Coaching Classes Khairi organized a felicitation ceremony for meritorious students on 17th June 2025.
     तर सुयश कोचिंग क्लासेस ची दुसरी विध्यार्थिनी  कु. ऋतुजा रवींद्र इंगोले ( रा. खैरी) हिने जनता महाविद्यालय चंद्रपूर अंतर्गत एम कॉम पदव्युत्तर अंतिम वर्षात गुणवत्ता यादीत ६ वा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तिचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.करमसिंग राजपूत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 
     त्यानंतर १२ वीत उतीर्ण झालेल्या प्रतीक्षा असुटकर,धनश्री बर्डे,जया ठाकरे,वैष्णवी शेंबडे,स्नेहल कुमरे व वैशाली गेडेकर त्यासोबत दहावी मध्ये उतीर्ण झालेल्या समृद्धी ताजने ,श्रुतिका धोटे व भाविक वनकर इत्यादी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेल्या दिपमाला वेट्टी मॅडम व संदीप आडे सर यांनी केले. कार्यक्रमाला डॉ.प्रसाद खानझोडे ,डॉ.करमसिंग राजपूत सर(वणी),दिपमाला वेट्टी, संदीप आडे, पुंडलिक भोयर, कल्पेश दवे उपस्थित होते. सोशल मिडिया समजून घेण्यापेक्षा आपली जबाबदारी समजून घ्या असे डॉ.प्रसाद खानझोडे यांनी सांगितले तसेच 'लक व प्रयत्न' याविषयी बोधकथेच्या माध्यमातून सुंदर मनोगत व्यक्त केले. विध्यार्थ्यांनी आयुष्यात आपले कार्य निरंतरपने करत राहिले पाहिजे असे डॉ. करमसिंग राजपूत यांनी सांगितले. दिपमाला वेट्टी यांनी सुधा मौलिक मार्गदर्शन केले. संचालन सुजाता काळे तर आभार श्रद्धा महाजन हिने मानले. 
     कार्यक्रमाला सुयश कोचिंग क्लासेस चे सर्व आजी-माजी विध्यार्थी गण, पोस्ट ऑफिस चे कर्मचारी आदींनी कार्यक्रमाच्या नियोजनात महत्वाची भूमिका बजावली. 

Post a Comment

0 Comments