वणीतील तज्ञ, उत्कृष्ठ विधीज्ञ कार्यकुशल नेतृत्व निलेश चौधरी यांची भाजपा शहराध्यक्ष पदी निवड....
कर्तव्यदक्ष, कार्यक्षम, चातूर्यवान व्यक्तीच्या निवडीने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांत उत्साहाचे वातावरण...
वणी :- सुरज चाटे
वणी परिसरात वकिली क्षेत्रात अग्रगण्य श्रेणीत असलेले कर्तव्यदक्ष, कार्यक्षम, चातूर्यवान उत्कृष्ठ विधीज्ञ ऍड. निलेश चौधरी यांची वणी शहर भाजपा शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Adv. Nilesh Chaudhary, a conscientious, efficient, and resourceful lawyer who is at the forefront of the legal profession in the Wani area, has been appointed as the Wani City BJP City President.
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले तथा रॉयल फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष न्यायिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ सेवा देणारे. वणी येथील ऍड. निलेश महादेवराव चौधरी हे सर्वसामान्यांना न्याय देण्या करीता झटत असतात. त्यांनी विविध समजुपयोगी कार्यक्रम घेत गोर गरिबांना त्याचा लाभ करून दिला आहे.
कुणावरही अन्याय होऊ नये या दृष्टिकोनातून लढणारे युवा खणखर नेतृत्व म्हणून सुद्धा त्यांची वेगळी ख्याती आहे. पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीच्या वणी शहर अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती म्हणजे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी घडामोड असून जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना त्यामुळे वेग आला आहे.
0 Comments