लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त महारक्तदान संकल्प...
विक्रमी संख्येने रक्तदान करुया.. चला सामाजिक बांधिलकी जोपासुया....
सेवा ते संघटन अभियान...
वणी :- सुरज चाटे
महाराष्ट्रात खुप कमी रक्त साठा शिल्लक आहे. कमी असलेला रक्ताचा साठा लक्षात घेता पुढील रुग्णांना रक्त कसे मिळणार हा गंभीर प्रश्न भेडसावत आहे. रक्ताची गरज लक्षात घेत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त दि. २२ ला वसंत जिनिंग येथे महारक्तदान संकल्पा चे आयोजन करण्यात आले आहे.
There is very less blood stock in Maharashtra. Considering the low blood stock, how will the next patients get blood is a serious question. Considering the need for blood, on the occasion of the birthday of the popular Chief Minister of Maharashtra state, Devendraji Fadnavis, a Maharaktadan Sankalpa has been organized at Vasant Jining on the 22nd.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान... रवींद्र चव्हाण, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांचे संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवंद्रजी फडणवीस यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा ते संघटन अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा द्वारा दि. २२ ला वसंत जिनिग हॉल येथे सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत भव्य महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. यात वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेनी सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 Comments