ADvt

भाऊ आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...



     अग्रगण्य अधिवक्ता, समाजसेवक, भारतीय जनता पक्षाचे वणी शहर अध्यक्ष तथा रॉयल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष
ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी यांना जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

     वणी परिसरात आपल्या बुद्धिमत्तेने, कार्यक्षमतेने आणि न्यायासाठी झटणाऱ्या वृत्तीने एक वेगळी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी. न्यायिक क्षेत्रातील चातुर्य, तडफदार मांडणी आणि सामान्य जनतेसाठी झटणारा त्यांचा स्वभाव, यामुळे ते वणी तालुक्यातील अग्रगण्य विधीज्ञांपैकी एक म्हणून ओळखले जातात.


      फक्त न्यायालयापुरते सीमित न राहता, सामाजिक व राजकीय कार्याची धुरा त्यांनी खांद्यावर घेतली आणि भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष म्हणुन व “रॉयल फाऊंडेशन” या संस्थेची स्थापना करून सामाजिक बदलाचे एक मजबूत व्यासपीठ निर्माण केले. या फाऊंडेशनला चार वर्षे पूर्ण झाली असून, त्या काळात संस्थेने असंख्य सामाजिक, आरोग्यविषयक आणि शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. संस्थेच्या माध्यमातून एम्बुलन्स सेवा, रक्तदान शिबिरे, कॅम्प, शैक्षणिक सहाय्य आणि गरजूंसाठी कायदेशीर मदत अशा अनेक उपक्रमांद्वारे समाजसेवेची नवी परंपरा निर्माण करण्यात आली.


    सामाजिक न्याय, मानवी मूल्ये आणि सर्वसमावेशक विकासाची भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. भाजपा शहराध्यक्ष ॲड. निलेशभाऊ माया महादेवराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रॉयल फाऊंडेशनने वणीतील अनेक गरजू लोकांच्या जीवनात प्रकाश आणला आहे.

     त्यांच्या या अथक परिश्रमांना, सेवाभावाला आणि नेतृत्वगुणांना मनःपूर्वक सलाम करत....

🌺 वणीतील अभिमान,
कर्तव्यदक्ष, कार्यक्षम आणि जनतेचा न्यायाचा आधार ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी
यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌺

✨ आपले आयुष्य दीर्घ, निरोगी आणि यशस्वी होवो हीच शुभेच्छा! ✨...


शुभेच्छुक : ॲड. निलेश भाऊ चौधरी मित्र परिवार तथा रॉयल फाउंडेशन वणी

Post a Comment

0 Comments