ADvt

अभिनय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी शुभम उगले यांचा सत्कार...वणी :- सुरज चाटे

वणी शहरातील युवा अभिनेता ह्यांना अत्यंत कमी वयात चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.ह्याच संधीची वाट शुभम अनेक दिवसांपासून करत होता. नुकताच नेटफलिक्स वर रिलीज झालेल्या इंडियन प्रिडेटर या वेब सिरीज मधल्या मर्डर इन द कोर्ट रूम या भागात वकील म्हणून शुभम ने भूमिका साकारली. 
     त्या पाठोपाठ आताच ४ नोव्हेंबर ला रिलीज झालेल्या पल्याड चित्रपटात शुभम ने आणखी एक भूमिका साकारली आहे. शुभम च्या या उत्तुंग भरारी साठी श्री विश्वकर्मा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी रूपक अंड्रस्कर , कल्पक अंड्रस्कर, सचिन अंड्रस्कर , दिनेश साखरकर, राजू साखरकर , अभय गटलेवार, शुभम झिलपे, ऋतिक झिलपे , ओम उपरे , प्रसाद झिलपे , प्रफुल झिलपे, प्रशांत झिलपे, दीपक साखरकर, रितेश साखरकर शुभम बर्डे , मनीष बुरडकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments