ADvt

कायर नवरगाव परिसरात वाघाचा हल्ला...



कायर नवरगाव परिसरात वाघाचा हल्ला; गाय ठार...

चराईसाठी जंगलात गेलेल्या गायीवर वाघाची झडप; वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल

वणी :- सुरज चाटे

   कायर नवरगाव परिसरात वाघाच्या हल्ल्याची घटना समोर आली असून, या हल्ल्यात एका गायीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दि. २९ रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर निळकंठ गौरकार यांच्या मालकीची गाय गुराखी चराईसाठी घेऊन गेला होता. यावेळी जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक गायीवर हल्ला चढविला. या हल्ल्यात गाय वाघाच्या तावडीत सापडली. या घटनेने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, दि. 30 ला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची चमू घटनास्थळी दाखल झाली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.
     दरम्यान, कायर नवरगाव परिसरात वाघाच्या हल्ल्याची घटना घडल्याने पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने परिसरात गस्त वाढवून नागरिक व पशुधनाच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments