वणीत १३ ऑक्टोबरला मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन...
श्री. भाग्यशाली सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ, काळे जनरल व स्किन क्लिनिक आणि फिनिक्स फार्मा यांचा संयुक्त उपक्रम; त्वचा व केसांच्या आजारांचे निदान, मोफत औषधवाटप...
वणी :- सुरज चाटे
श्री. भाग्यशाली सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ, वणी यांच्या वतीने काळे जनरल व स्किन क्लिनिक, वणी आणि फिशन फार्मा, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी 10 ते 2 या वेळेत देवीचे मंडप, नगर परिषद शाळा क्रमांक 4, वणी येथे हे शिबिर होणार आहे.
या शिबिरामध्ये केस व त्वचेशी संबंधित आजारांचे निदान तसेच मोफत औषधवाटप करण्यात येणार आहे. नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांची तपासणी करून घेण्याची आणि आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन मिळविण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध होणार आहे.
सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा वणी शहरातील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिबिराच्या नाव नोंदणी व अधिक माहिती करिता ब्रिजेश निंदेकर, निखिल पिदूरकर, विजय गव्हाणे, राजुभाऊ मारगमवार आणि शुभम दासरवार यांना संपर्क साधावा.
या उपक्रमाला काळे जनरल व स्किन क्लिनिकच्या डॉ. पूजा काळे (ठाकरे) तसेच फिशन फार्माचे प्रोप्रायटर नमिश काळे यांचे सहकार्य लाभले आहे.
*अधिक माहितीसाठी संपर्क :*
- ब्रिजेश निंदेकर – ९०२८४९७९१९
- निखिल पिदूरकर – ९९२१६००६३८
- विजय गव्हाणे – ९८२२९२६४८०
- राजुभाऊ मारगमवार – ९७६४०८८०७०
- शुभम दासरवार – ९३५६४८१९६३
मोठ्या प्रमाणात शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.







0 Comments