ADvt

रंगनाथ नगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या




रंगनाथ नगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या :- परिसरात हळहळ...

राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला राहुल देविदास डोलरवार (३०); घटनेने परिसरात शोककळा

वणी :- सुरज चाटे 

      शहरातील रंगनाथ नगर परिसरात राहुल देविदास डोलरवार (वय ३०) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
     मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रंगनाथ नगर येथील रहिवासी असलेला राहुल डोलरवार हा शुक्रवारी आपल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.
     आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  यासंदर्भात पुढील माहिती उपलब्ध झाल्यानंतर घटनेचे अधिक तपशील स्पष्ट होऊ शकतील.
     या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments