ADvt

वणी न प च्या पार्किंग परिसरात अचानक गाडीला लागली आगकाळजी घेण्याची गरज :- समयसुचकतेने मोठी घटना टळली....

वणी :- सुरज चाटे

     वणी शहरातील मध्यभागी असलेल्या नगर परिषद जवळील पार्किंग झोन मध्ये अचानक एका चारचाकी वाहनाला दिनांक 25 एप्रिल 2023 ला दुपारी दिड च्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली. 


     वणीच्या पार्किंग झोन मध्ये चारचाकी वाहन दाखल झाले पार्किंग येथील उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याने त्यांना सांगितले की भैया कार मेसे धुवा निकलराहा त्यामुळे कारमधील मंडळी बाहेर निघाले, दरम्यान अचानक आगेने रुद्र रूप धारण केले होते. पार्किंग झोन मध्ये गाडीला नेमकी आग कशी लागली? याचे कारण अजूनतरी अस्पष्ट असुन समयसुचकतेने यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. मात्र त्यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही, मात्र कारचे मोठे नुकसान झाले असुन, लवकरच यावर उपाय केल्याने व सतर्कतेने मोठी घटना टळल्याचे दिसून आले. 

Post a Comment

0 Comments