ADvt

समाजकारणाच्या मातीत रुजलेले नेतृत्व आज जनमानसाच्या विश्वासाचे केंद्र....



समाजकारणाच्या मातीत रुजलेले नेतृत्व आज जनमानसाच्या विश्वासाचे केंद्र....

ध्येयवेडं व्यक्तिमत्त्व... जनसेवेचा ध्यास अन् राजकारणात कर्तृत्वाचा ठसा...

ॲड निलेश माया महादेवराव चौधरी.....संघर्षातून घडलेला प्रेरणादायी प्रवास...

वणी :- सुरज चाटे 

     कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना संघर्ष, जिद्द, सामाजिक बांधिलकी, अभ्यासू वृत्ती आणि संघटन कौशल्याच्या जोरावर सार्वजनिक जीवनात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणे, ही सहजसाध्य गोष्ट नाही. मात्र, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ही वाटचाल शक्य करून दाखविणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी.


     सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज वकिली, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनातील नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे. संघर्षाला संधी मानून प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध करण्याची त्यांची जिद्द त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख ठरली आहे.
     दि. ७ ऑक्टोबर १९८० रोजी मध्यमवर्गीय कुटुंबात ॲड. निलेश चौधरी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पंचायत समिती, वणी येथे ओरशीअर पदावर कार्यरत होते. पाच भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या निलेश चौधरी यांना कुटुंबातील ताई आणि भावाचे मोलाचे सहकार्य लाभले. कुटुंबीयांच्या पाठबळासोबतच स्वतःच्या मेहनतीची जोड देत त्यांनी एल.एल.बी. आणि एल.एल.एम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि आपल्या सहकाऱ्यांसाठी काहीतरी करण्याची वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात रुजत गेली.
     सन २००४ पासून वकिली व्यवसायात पदार्पण करत त्यांनी अभ्यासू वृत्ती, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर कायदे क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. शालेय जीवनापासूनच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील नेतृत्वगुण आणि बुद्धिमत्तेची चुणूक दिसून येत होती. एन.सी.सी.च्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली. देश आणि समाजाप्रती असलेली हीच भावना पुढे सामाजिक बांधिलकीमध्ये परिवर्तित झाली.
     महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविताना त्यांच्यातील नेतृत्वगुण अधिक ठळकपणे समोर आले. सहकाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याची त्यांची भूमिका पुढील सामाजिक प्रवासाची पायाभरणी ठरली.


      याच काळात त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे विद्यापीठ प्रतिनिधी तसेच विधी महाविद्यालयांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली. विद्यार्थी नेतृत्वाच्या या अनुभवातून संघटन, संवाद आणि प्रश्न सोडविण्याची क्षमता अधिक विकसित झाली.

वकिली हा व्यवसाय; समाजसेवा हे ध्येय..
     काळाच्या ओघात वकिली हा त्यांचा व्यवसाय बनला; मात्र समाजसेवेची तळमळ कधीच मागे पडली नाही. न्यायालयीन कामकाजाची जबाबदारी सांभाळतानाच सामान्य, गरजू आणि तळागाळातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी धावून जाण्याची त्यांची वृत्ती कायम राहिली.

     सामाजिक कार्याला अधिक संघटित स्वरूप देण्यासाठी त्यांनी रोटरी क्लब, वणीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांना चालना दिली. समाजासाठी काम करणाऱ्या सहकाऱ्यांना एकत्र आणत सामाजिक कार्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने पुढे ‘रॉयल फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेची उभारणी केली. आज रॉयल फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना आरोग्यविषयक मदत, विविध अडचणींच्या काळात सहाय्य तसेच सामाजिक उपक्रम राबविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे संस्थेनेही सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

समाजकारणातून सार्वजनिक जीवनाकडे...

     सामाजिक कार्यातून निर्माण झालेला जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि नेतृत्वाची क्षमता यामुळे त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याची व्याप्ती वाढत गेली. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर वणी शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली.

     कोणतीही पारंपरिक राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी संघटनात्मक कामाला प्राधान्य दिले. कार्यकर्त्यांशी संवाद, नियोजन, संघटन आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाची स्थानिक संघटना अधिक सक्रिय ठेवण्यासाठी त्यांनी भूमिका बजावली. वणी शहरातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये नियोजनबद्ध कामकाज, संघटन कौशल्य आणि रणनीतीचा प्रभावी वापर करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. मागील वर्षी झालेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या काळातही त्यांच्या संघटनात्मक नियोजनाची आणि राजकीय रणनीतीची चर्चा झाली.

संघर्षातून घडलेले नेतृत्व....
     एका सामान्य कुटुंबातील तरुणाने परिस्थितीशी संघर्ष करत शिक्षण पूर्ण केले. कायद्याचे उच्च शिक्षण घेतले. वकिली व्यवसायात स्वतःची ओळख निर्माण केली. समाजसेवेची वाट निवडली. सामाजिक संस्थेची उभारणी केली आणि पुढे सार्वजनिक जीवनातील नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. हा प्रवास केवळ यशाचा नाही; तर संघर्ष, जिद्द, सातत्य आणि सामाजिक बांधिलकीचा प्रवास आहे. त्यांच्या वाटचालीकडे पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी ध्येय स्पष्ट असेल, मेहनतीची तयारी असेल आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असेल तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता येते.

वाढदिवस म्हणजे कर्तृत्वाचा आढावा...
      दि. ७ ऑक्टोबर हा ॲड. निलेश चौधरी यांच्या जीवनातील विशेष दिवस. वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच त्यांच्या आजवरच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाकडे पाहण्याची ही एक संधी आहे.

      वकिलीच्या क्षेत्रात अभ्यासू आणि मेहनती अधिवक्ता, सामाजिक क्षेत्रात गरजूंच्या मदतीसाठी तत्पर समाजसेवक आणि सार्वजनिक जीवनात संघटनात्मक जबाबदारी समर्थपणे पार पाडणारे नेतृत्व—अशा विविध भूमिका त्यांनी आजवर बजावल्या आहेत.
     संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व, समाजकारणातून तयार झालेले नेतृत्व आणि कर्तृत्वातून निर्माण झालेली स्वतःची ओळख, हीच ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी यांच्या जीवनप्रवासाची खरी ओळख म्हणावी लागेल.
     अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक व सार्वजनिक जीवनातील भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!..

Post a Comment

0 Comments