ADvt

नांदेपेरा येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्याआत्महत्ये मागचं नेमकं कारण काय?....

वणी :- सुरज चाटे

वणी तालुक्यातील नांदेपेरा येथील इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 07 ऑगस्ट 2023, ला उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वणी तालुक्यातील नांदेपेरा येथील एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. मॄतक नामे:गणपत जयराम वांढरे, वय.५५ वर्ष.रा नांदेपेरा पो स्टे वणी यांनी दिनांक 07 ऑगस्ट 2023 ला सकाळच्या दरम्यान आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.  सदर घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी मॄतकाचे शव ग्रामीण रुग्णालय  वणी येथे दाखल केले असता मॄतकाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यांत आले. गणपत ने आत्महत्या का केली हे अजुन कळले नाही. पुढील तपास वणी पोलीस करत आहे. गणपत ने आत्महत्या का केली हे अस्पष्ट असुन, परिसरात त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. 

Post a Comment

0 Comments