ADvt

महाशिवरात्री निमित्य दर्शन घेऊन येताना अंघोळीला गेले अन पाण्यात बुडाले.....



तीन युवक वर्धा (पाटाळा) नदीत बुडाले :- पाण्याचा अंदाज न आल्याने अनर्थ घडल्याचा कयास..

वणी :- सुरज चाटे

     महाशिवरात्री निमित्य विविध ठिकाणी शिव मंदिर असल्याने भक्तांची मोठी मांदियाळी असते. दिनांक 8 ला चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात येणाऱ्या भटाळा येथे महाशिवरात्री निमित्य मोठे प्रमाणात शिवभक्त जात असतात. वणीतीलच काही युवक या जत्रेसाठी गेले अन दर्शन घेऊन येत असताना वर्धा नदी पात्र पाटाळा येथे अंगोळीला उतरले असता त्यातील दिघे जण वाहून गेल्याची धक्कादायक माहिती 5 वाजताच्या सुमारास समोर आली आहे. यात हर्षल अतिष चाफले, अनिरुध्द सतिष चाफले, संकेत पुंडलिक नगराळे तिघांचे ही अंदाजे वय 16 ते 22 च्या सुमारास आहे.

   On the occasion of Mahashivratri, there is a huge gathering of devotees as there are Shiva temples in various places. A large number of Shiva devotees go to Bhatala in Varora taluka of Chandrapur district on the 8th on the occasion of Mahashivratri. A shocking information has come to light around 5 o'clock that while some youths from Vani had gone for this fair and were bringing darshan, two of them were washed away when the Wardha river entered the river at Patala. Harshal Atish Chafle, Anirudh Atish Chafle, Sanket Pundalik Nagarle are aged between 16 and 22.

     शिवरात्री निमित्य ठीक ठिकाणी पूजा अर्चा होत असते. चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा तालुक्या अंतर्गत येत असलेले भटाळा हे जुने मंदिर आहे. दरम्यान या ठिकाणी दूरवरून भक्तगण दर्शनासाठी येत असतात. त्याच यात्रेकरिता वणीतील 11 युवक दर्शनाकरिता गेले होते. दर्शन घेऊन वणी च्या दिशेने येताना पाटाळा येथील वर्धा नदी पात्रात अंगोळीचा मोह त्यांना आवरला नाही. ते अंगोळीला गेले असता त्यातील काही युवकांपैकी अगोदर एक युवक नदी पात्रात गेला मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला तो परत न आल्याने त्या मागे दोघे गेले. परंतु तिघेही नामे हर्षल अतिष चाफले, अनिरुध्द सतिष चाफले, संकेत पुंडलिक नगराळे, तिघेही रा विठ्ठलवाडी, वणी, तिघांचे ही अंदाजे वय 16 ते 22 च्या सुमारास आहे. परंतु ते पाण्यातुन परत आले नाही. घाबरलेल्या इतरांनी घरच्यांना याची माहिती दिली. वृत्त लिहे पर्यंत त्यांचा कुठलाही ठावठिकाणा लागला नाही. घटनास्थळी वणी, माजरी, वरोरा पोलीस पोहोचले असुन पुढील तपास सुरू आहे.  

एकाच घरातील दोघे भाउ....
    वणीतील विठ्ठलवाडी परिसरातील तिघेही असुन एका कुटुंबातील दोन भाऊ नदीत बुडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान महाशिवरात्रीच्या दिवशी त्या कुटुंबियांवर काळाचा घाला झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 
    

Post a Comment

0 Comments