विक्रांत चचडा यांची वरोरा–वणी–आर्णी लोकसभा युवासेना अध्यक्षपदी निवड...
जनतेशी जुळलेली नाळ... पक्षाने दिली पदोन्नती वाढ...
वणी :- सुरज चाटे
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना (शिंदे गट) चे मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार व खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.
Vikrant Chachda, who has made a mark in the minds of the people in the social and political fields in a short span of time, has been appointed as the President of Warora-Vani-Arni Lok Sabha Yuva Sena. The appointment was made from the central office.
या घोषणेत सामाजिक व राजकीय क्षेत्रात अल्पावधीतच जनतेच्या मनात ठसा उमटवणारे विक्रांत चचडा यांची वरोरा–वणी–आर्णी लोकसभा युवासेना अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती मध्यवर्ती कार्यालयातून करण्यात आली.
सदर नियुक्ती यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड, पराग भाऊ पिंगळे (पश्चिम विदर्भ समन्वयक शिवसेना), हरिहर भाऊ लिंगांवर (संपर्क प्रमुख, यवतमाळ जिल्हा), राजुदास जाधव साहेब (जिल्हाप्रमुख, शिवसेना) आणि विश्वास भाऊ नांदेकर (लोकसभा समन्वयक, शिवसेना) यांच्या नेतृत्वात व विश्वासाने करण्यात आली आहे.
तसेच ही नियुक्ती युवासेना कार्याध्यक्ष पुरवेश साहेब सरनाईक, मुख्य सचिव राहुल लोंढे साहेब, सचिव किरण साळी साहेब, पूर्व विदर्भ सचिव शुभम नवले आणि पूर्व विदर्भ निरीक्षक हर्षल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झाली आहे.
विक्रांत चचडा यांनी या जबाबदारीबद्दल सर्व वरिष्ठ नेत्यांप्रती मनःपूर्वक आभार व्यक्त केले असून,
“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालत संघटनेला बळकट करणे, हीच माझी प्राथमिकता असेल,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
या नियुक्तीमुळे वरोरा–वणी–आर्णी परिसरातील युवासैनिकांमध्ये उत्साह, ऊर्जा आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 Comments