वणीमध्ये माँ जगदंबा नागरी सहकारी पतसंस्थेच्या नव्या शाखेचा भव्य शुभारंभ...
मराठी सुप्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे यांची विशेष उपस्थिती...
मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा रंगणार...
सत्यभाषा न्युज वणी :- माँ जगदंबा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पांढरकवडा यांच्या वणी येथील नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता उत्साहात पार पडणार आहे. संत गाडगेबाबा चौक, जत्रा मैदान रोड वणी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार राहणार असून उद्घाटन आमदार संजयभाऊ देरकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सुप्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंदजी अनासपुरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमात नंददीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीपजी शिंदे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर, नानासाहेब चव्हाण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ, सौ. विद्याताई आत्राम नगराध्यक्षा न. प. वणी, संजय खाडे संचालक पणन महासंघ महाराष्ट्र राज्य, अनिलजी अक्केवार सचिव केशव नागरी सह. पत. वणी, नितीनजी पखाले संचालक शब्दयात्रा प्रकाशन तथा सहकार क्षेत्रातील मान्यवर, तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
या उद्घाटन सोहळ्यानिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन गजानन अशोकराव बेजंकीवार (अध्यक्ष), काशिनाथ केशवराव मिलमिले (उपाध्यक्ष), रमेश नारायण भुरे (सचिव), अण्णासाहेब देशमुख पारवेकर, विरभद्र बाजीराव पाटील, दिलीप नरसिमलु अंगलवार, राजेश ल. शंकर पसलावार, सुनिल माधवराव ठाकरे, भरत लक्ष्मण पोतराजे, विरेंद्र शंकरराव तोडकरी, विलास नामदेवराव बनकर, ज्योती रमेश अडपावार, अर्चना राजेश धुंदी, अजय बाळाभाऊ पालतेवार, सचिन सुरजलाल अग्रवाल (मुख्य व्यवस्थापक), सुरज रमेशराव चाटे (शाखा व्यवस्थापक) यांच्याकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.










0 Comments