ADvt

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वणी शहरात रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद...



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वणी शहरात रक्तदान महायज्ञाला उत्स्फूर्त प्रतिसाद...

भर पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती....

वणी शहरात १५२ सर्वाधिक रक्तपिशव्यांचे संकलन...


वणी :- सुरज चाटे 

    महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष ॲड. श्री प्रफुल चव्हाण यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान महायज्ञ राबविण्यात आला. त्याच संकल्पनेतून वणी विधानसभेत माजी आमदार श्री संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.


     भारतीय जनता पार्टी वणी शहर, वणी ग्रामीण पूर्व आणि वणी ग्रामीण पश्चिम यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी बाजोरिया हॉल वणी येथे हेडगेवार रक्तकेंद्र नागपूर यांच्या सहकार्याने “रक्तदान शिबिर” चे आयोजन करण्यात आले होते, सदर शिबिरात एकूण ४१२ जणांनी नोंदणी केली. तपासणीनंतर त्यापैकी २७२ रक्तदात्यांचे रक्त संकलन करण्यात आले. या शिबिरात एकूण ४१२ जणांनी रक्तदानासाठी नोंदणी केली. वैद्यकीय तपासणीनंतर २७२ रक्तदात्यांकडून रक्तसंकलन करण्यात आले. त्यामध्ये वणी शहरातून २०५ नोंदणी व १५२ रक्तसंकलन, वणी ग्रामीण पूर्वमधून १३२ नोंदणी व ७० रक्तसंकलन, तर वणी ग्रामीण पश्चिममधून ७५ नोंदणी व ५० रक्तसंकलन करण्यात आले.


       शिबिराला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहिर, माजी आमदार श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार, विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ किसान नेते श्री. दिनकर पावडे व जेष्ठ कामगार नेते श्री. विजय पिदुरकर, माजी जिल्हाध्यक्ष श्री. राजू डांगे आणि श्री. तारेंद्र बोर्डे, ओ.बी.सी. आघाडी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष श्री पवन एकरे, माजी यवतमाळ जिल्हा परिषद गट नेत्या सौ. मंगला ताई पावडे यांनी भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.


     सदर शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी नगर परिषद वणीच्या नगराध्यक्ष सौ. विद्याताई आत्राम व उपाध्यक्ष श्री. राकेश बुग्गेवार, विधानसभा प्रमुख आणि जिल्हा उपाध्यक्ष श्री. संजय पिंपळशेंडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. रवी बेलुरकर, रक्तदान अभियान विधानसभा संयोजक आणि जिल्हा उपाध्यक्ष श्री. अंकुश बोडे, जिल्हा सचिव श्री. संतोष डंभारे, जिल्हा सचिव श्री. नितीन वासेकर, माजी तालुका अध्यक्ष श्री गजानन विधाते, माजी वणी पंचायत समिती सभापती सौ. लिशा ताई विधाते, जेष्ठ नेत्या सौ. जयमाला ताई दरवे, जेष्ठ नेत्या सौ. संध्याताई लोडे तसेच जिल्ह्यातील व वणी विधानसभेतील आजी-माजी लोकसेवक आणि पदाधिकारी, नगर परिषद वणीचे सर्व सन्माननीय सभापती व नगरसेवक, तीनही मंडळांचे अध्यक्ष, सरचिटणीस व पदाधिकारी, विविध आघाडी व सेल चे अध्यक्ष आणि पदाधिकारी तसेच रक्तदान शिबिराचे संयोजक व सहसंयोजक यांनी परिश्रम घेतले.


      दिवसभर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असतानाही नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान केल्याबद्दल आयोजकांनी सर्व रक्तदाते व नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सौ भारती बदखल आणि आभार प्रदर्शन श्रीमती वैशाली वातिले यांनी केले, शिबिराकरिता विशेष सहकार्य बाजोरिया हॉल चे संचालक श्री विनोद बाजोरिया यांचे लाभले.

Post a Comment

0 Comments