ADvt

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाला वणीतून जोरदार पाठिंबा..


दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनाला वणीतून जोरदार पाठिंबा... लाठीचार्जच्या निषेधार्थ शांतता मार्च...

युवाशक्ती संघटना व AISF च्या संयुक्त विद्यमाने निदर्शने; आंदोलनकर्त्यांवरील दडपशाही थांबवून निष्पक्ष चौकशीची मागणी....

वणी :-  सुरज चाटे 

     दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी व युवकांच्या विविध मागण्यांसाठी शास्त्रज्ञ, शिक्षक सोनम वांगचुक व अभिजीत दीपके (CJP) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित वणी येथे युवाशक्ती संघटना आणि ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) यांच्या संयुक्त विद्यमाने शांततापूर्ण निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करून तहसील कार्यालयापर्यंत निषेध मार्च काढण्यात आला.


     यावेळी आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीचार्जचा तीव्र निषेध करण्यात आला. लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून, अशा आंदोलनांवर बळाचा वापर करणे हे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारे असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.


     आंदोलनकर्त्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य कराव्यात, आंदोलनावरील दडपशाही थांबवावी तसेच लाठीचार्ज प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


     या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड, युवा हुंकार संघटना, बार कौन्सिल, वणी शेतकरी संघटना तसेच लढा संघटना यांनी जाहीर पाठिंबा दिला. विविध सामाजिक, विद्यार्थी व युवक संघटनांनी लोकशाही हक्कांच्या संरक्षणासाठी एकजुटीने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
     आयोजकांच्या वतीने 

युवक व विद्यार्थ्यांना अन्यायाविरुद्ध संविधानिक मार्गाने संघटित होऊन व्यापक लोकचळवळ उभी करण्याचे आवाहन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments