बालगोपालांच्या सर्जनशीलतेला मिळणार व्यासपीठ..
भाजप वणी शहरातर्फे ‘तान्हा पोळा सजावट स्पर्धा २०२६’; विजेत्यांना रोख बक्षिसांसह सहभागी बालगोपालांना आकर्षक भेटवस्तू
वणी : - सुरज चाटे
भारतीय जनता पार्टी वणी शहराच्या वतीने वणी शहरातील बालगोपालांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘तान्हा पोळा सजावट स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक पोळा सणाची संस्कृती, बैलांविषयीचा स्नेह आणि पर्यावरणपूरक सजावटीचा संदेश बालगोपालांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता कल्याण मंडपम, मोठा हनुमान मंदिराजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वणी येथे होणार आहे. स्पर्धेतील प्रवेश निःशुल्क असून वणी शहरातील बालगोपालांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दोन वयोगटांत रंगणार स्पर्धा..
स्पर्धेसाठी दोन वयोगट निश्चित करण्यात आले आहेत. ‘अ’ गट (वय १ ते ५ वर्षे) यामध्ये प्रथम क्रमांकासाठी ₹५,०००, द्वितीय ₹३,००० आणि तृतीय क्रमांकासाठी ₹२,००० चे बक्षीस देण्यात येणार आहे. तर ‘ब’ गट (वय ६ ते १२ वर्षे) यामध्ये प्रथम ₹४,०००, द्वितीय ₹३,००० आणि तृतीय क्रमांकासाठी ₹२,००० चे बक्षीस देण्यात येणार आहे.
याशिवाय प्रत्येक गटासाठी ₹१,००० ची तीन प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवण्यात आली असून, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बालगोपालांसाठीही आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य...
स्पर्धेतील सजावट पर्यावरणपूरक व स्वदेशी वस्तूंच्या माध्यमातून करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक असून स्पर्धेच्या वेळेच्या किमान १० मिनिटे आधी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
स्पर्धेचे संयोजक रवि बेलूरकर, जिल्हा उपाध्यक्ष, यवतमाळ असून सहसंयोजक म्हणून सौ. नीता पिदूरकर, श्रीमती वैशाली वातिले, सौ. प्रतिभा मंथनवार, विलास डवरे, मयूर गोयनका आणि नितीन बिहारी कार्यरत आहेत.
वणी शहरातील पालकांनी आपल्या पाल्यांना या स्पर्धेत सहभागी करून त्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन माजी आमदार श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार आणि ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी, शहर अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी वणी यांनी केले आहे.







0 Comments