वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून संकटग्रस्तांसाठी मदतीचा हात...
ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम :- मुख्यमंत्री सहायता निधीस ₹२१ हजारांची मदत...
वणी : - सुरज चाटे
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकरी बांधवांसमोरील संकटाची जाणीव ठेवत ॲड. निलेश माया महादेव चौधरी यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळत त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस ₹२१,००० (एकवीस हजार रुपये) धनादेश नितीनकुमार हिंगोले उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत मदतीचा चेक देत संकटग्रस्त नागरिक व शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी आपला खारीचा वाटा उचलला. यावेळी डॉ. रोहित वनकर सर, हितेन अटारा, दिपक पाऊणकर, सागर भाऊ, प्रा. महादेवरावजी खाडे आदी उपस्थित होते.
वाढदिवस म्हटला की जल्लोष, केक आणि अनावश्यक खर्च करण्याची प्रथा रूढ होत असताना, ॲड. चौधरी यांनी या परंपरेला सामाजिक जाणीवेची दिशा देत ‘उत्सवापेक्षा सामाजिक बांधिलकी महत्त्वाची’ हा संदेश दिला आहे. महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अनेक शेतकरी व नागरिक अडचणीत असताना त्यांना मदतीचा हात देण्याच्या भावनेतून हा उपक्रम करण्यात आला.
यावेळी आपली भावना व्यक्त करताना ॲड. निलेश चौधरी म्हणाले, “वाढदिवस हा केवळ स्वतःचा आनंद साजरा करण्याचा दिवस न राहता समाजासाठी काहीतरी देण्याचा दिवस व्हावा, या भावनेतून ही मदत केली आहे. संकटाच्या काळात महाराष्ट्रातील गरजू नागरिक व शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”
त्यांच्या या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलता, माणुसकी आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे. स्वतःच्या आनंदाला सामाजिक मदतीची जोड देत वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा आहे.










0 Comments