ADvt

पुन्हा परंपरागत दसरा उत्सव रावण दहन उत्साहात...



वणी :- सुरज चाटे

     असत्यावर सत्याचा विजयाचा प्रतीक असलेला दसरा महोत्सव आपल्या वणी शहरात मागील अनेक दशकांपासून पंजाब सेवा संघ द्वारे मोठ्या हर्षोउल्लासात साजरा केला जातो परंतु मागील 2 वर्षांपासून कोरोना संकटामुळे कुठलेही सन उत्सव साजरे करता आले नाही, या वर्षी सर्व निर्बंध संपल्यामुळे यंदा पुन्हा दसरा उत्सव दि. 05/10/2022 रोजी संध्याकाळी 5.50 वाजता जत्रा मैदान येथे मोठ्या हर्षोउल्लासात साजरा होणार आहे. 
       श्रीराम मंदिर खाती चौक येथून भव्य दिव्य शोभायात्रा निघणार आहे पंजाब सेवा संघ, पंजाब नवयुवक मंडळ तसेच पंजाब महिला मंडळ च्या सर्व सदस्य याकरिता अथक परिश्रम घेत आहे, तरी सर्वांनी हा धर्मीक तसेच सामाजिक उत्सव साजरा करण्यासाठी जत्रा मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान पंजाब सेवा संघ चे अध्यक्ष गोपाल खुंगर सचिव लवलेश लाल तसेच पंजाबी नवयुवक मंडळ चे अध्यक्ष शुभम मदान यांनी केले असून या दसरा उत्सवा करीता श्रीराम मंदिर खाती चौक ईथुन भव्यदिव्य शोभायात्रा निघणार असून ही शोभायात्रा खाती चौक ते शिवाजी चौक - आंबेडकर चौक - टागोर चौक -  टुटी कमान चौक - गाडगे बाबा चौक - काठेड ऑईल मिल - दीपक टॉकीज चौक मार्गाने जत्रा मैदान पर्यंत जाईल अशी माहिती पंजाबी नवयुवक मंडळ चे प्रसिद्धी प्रमुख कपिल जुनेजा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

Post a Comment

0 Comments