ADvt

नालीची पाहणी करताना बांधकाम सभापतींचा पाय घसरला



नालीची पाहणी करताना बांधकाम सभापतींचा पाय घसरला...पायाला फ्रॅक्चर

नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत घटनास्थळी गेले असता अपघात; डॉ. खापणे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

वणी : - सुरज चाटे 

     शहरातील एका प्रभागात नाली चोकअप झाल्याची तक्रार प्राप्त होताच नागरिकांच्या समस्येची तातडीने दखल घेत नगर परिषदेचे बांधकाम सभापती लवलेश लाल हे स्वतः घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पोहोचले. नालीची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीची माहिती घेत असतानाच अचानक त्यांचा पाय घसरल्याने ते खाली पडले. या दुर्घटनेत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली.
     अपघातानंतर त्यांना तातडीने डॉ. खापणे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे निदान करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
     नाली चोकअपच्या तक्रारीनंतर केवळ संबंधित विभागाला सूचना न देता स्वतः घटनास्थळी पोहोचून कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याची सभापती लवलेश लाल यांची भूमिका या घटनेतून अधोरेखित झाली. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन सोडविण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीची चर्चा यानिमित्ताने होत आहे.
    दरम्यान, सभापती लवलेश लाल यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळताच त्यांचे सहकारी, मित्रपरिवार तसेच नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेताना घडलेल्या या अपघाताबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त करत लवकर बरे होऊन जनसेवेत यावे अशी भावना व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments