ADvt

वणीमध्ये रंगणार ‘नमो युवा रन’; युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश!



वणीमध्ये रंगणार ‘नमो युवा रन’; युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश....

भाजप वणी विधानसभा मतदारसंघातर्फे २५ सप्टेंबरला नशामुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन; विविध गटांतील विजेत्यांना रोख बक्षिसांसह सन्मानचिन्ह

वणी : - सुरज चाटे 

     पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त तसेच विक्रमपुरुष माजी आमदार मा. श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने ‘नमो युवा रन – नशामुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तथा लोकमान्य टिळक चौक, वणी येथे आयोजित करण्यात आली आहे.
     स्पर्धेत १६ वर्षांखालील मुले व मुलींसाठी २.५ किलोमीटर, तर १६ वर्षांवरील पुरुष व महिलांसाठी ३.५ किलोमीटर अंतराची स्वतंत्र गटवारी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ₹५,०००, ₹३,०००, ₹२,००० व ₹१,००० अशी रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत.

‘नशामुक्त भारत’चा संदेश देण्याचा प्रयत्न
     युवकांमध्ये व्यसनमुक्ती, आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. स्पर्धेत प्रवेश विनामूल्य असून, सहभागी होण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक आहे. नाव नोंदणी दि. २५ सप्टेंबर रोजी स्पर्धेच्या ठिकाणीच करता येणार आहे. स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यास त्याची जबाबदारी स्पर्धकाची राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहणार असून, वणी विधानसभा मतदारसंघातील स्पर्धकांनाच सहभागी होता येणार आहे.
     या उपक्रमासाठी भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments