ADvt

जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत श्री रामदेव बाबा विद्यालय अव्वल



वणी :- सुरज चाटे
यवतमाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत वणी येथील श्री रामदेव बाबा मूकबधिर मतिमंद कर्मशाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेत दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही जिल्ह्यातून प्रथम स्थान प्राप्त केले आहे.


    क्रीडा स्पर्धेमध्ये 50, 100, 400 मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक, स्पोट जम्प असे वेगवेगळ्या वयोगटात व प्रवर्गात श्री रामदेव बाबा मूकबधिर मतिमंद कर्मशाळेतील अनिता आत्राम,दीपक मेश्राम,पूजा कोडपे, दिव्या मडावी, सुजन कांबळे,श्रवण उपरे,कामाक्षी चोपणे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकविले. प्रथम क्रमांक अर्जित केलेले विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरी स्पर्धाकरीता झालेली आहे. तसेच सिमरन कश्यप,दीप खोब्रागडे,वेदिका भोयर,चेतन सोनटक्के,समीर आत्राम, महादेव भोयर, किरण पंधरे द्वितीय एवं तृतीय क्रमांक प्राप्त केले. क्रीडा स्पर्धेनंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला एवं द्वितीय स्थान प्राप्त केला. पुढे होणारे राज्यस्तरीय स्पर्धासाठी संस्थेचे अध्यक्ष दलितमित्र मेघराज भंडारी यांनी शुभे्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये मिळालेल्या यशाच्या मानकरी शाळेची मुख्याध्यापिका सरोज जैन शिक्षकगण चित्रलेखा लारोकर, भारती हिवरे, प्रतिभा मोहूर्ले तसेच कर्मचारी महेश करलुके, अजय गिरी,सुरेश मरकड,अनु गोंडे, नीलिमा गुरनुले यांनी परिश्रम घेतले. वर्ष २०१९ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून यवतमाळ जिल्हाला द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला होता त्यामध्ये सुध्दा श्री रामदेव बाबा अपंग मूकबधिर विद्यालयाची ऐतिहासिक कामगिरीमुळे हे विशेष बाब.

Post a Comment

0 Comments