ADvt

क्रांतीसुर्य ज्योती सावित्री महानाट्याचे आयोजनवणी :- सुरज चाटे
         महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असताना त्या अनुषंगाने पुढाकार घेऊन जनहित कल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांनी जनहित महिला कल्याण संघटना,युवा क्रांती संघटना तसेच ग्रामीण पत्रकार संघ शाखा मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरात 3 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता बी.अँड सी. कॉर्टर मारेगाव येथे "क्रांतीसुर्य ज्योती सावित्री" या महानाट्याचे आयोजन केले असून सावित्रीच्याच लेकिन द्वारे महिला सबलीकरण व सक्षमीकरण कसे करता येईल हे या नाट्यातून दाखविले जाणार आहे.
           सदोदित सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जनहित कल्याण संघटना, क्रांती युवा संघटना तथा ग्रामीण पत्रकार संघ, शाखा मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आता महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लोक जागृती संस्था चंद्रपूर निर्मित समाजात जागृतीची मशाल पेटवणाऱ्या "क्रांतीसुर्य ज्योती सावित्री"या भव्य महा नाट्याचे आयोजन केले आहे. महिलांचे सक्षमीकरण ही आजच्या काळाची गरज असून महिलांच्या सक्षमीकरिता कायदेमंडळात बरेचसे कायदे असून सुद्धा महिलांचे पूर्णपणे सक्षमीकरण होत नाही. सदर महानाट्याद्वारे महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृती केली जाणार असून शहरवासी तसेच तालुका वासियांनी सदर महानाट्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सर्व आयोजक तथा जनहित कल्याण संघटनेचे अध्यक्ष संस्थापक गौरीशंकर खुराना यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments