कर्तव्यावरून परतताना काळाचा घाला...
होमगार्ड वाहून नेणाऱ्या बसचा माहूरगड जवळ भीषण अपघात
सत्यभाषा न्युज : सुरज चाटे
मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे तीनशे होमगार्ड पुणे (पिंपरी-चिंचवड) येथील निवडणूक कर्तव्य बजावून परतत असताना त्यांच्या ताफ्यातील एका बसचा माहूरगड जवळ भीषण अपघात झाला. मांडवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत, उनकेश्वर–बोथ फाट्याजवळ दि. १८ ला दुपारी दोन वाजता च्या दरम्यान हा अपघात झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या अपघातात मोठ्या प्रमाणात हानी झाली असून मृतांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. बसमध्ये मोठ्या संख्येने होमगार्ड प्रवास करत असल्याने जखमींची संख्या लक्षणीय असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, स्थानिक यंत्रणा तसेच आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून बचावकार्य वेगाने चालू आहे.
कर्तव्य बजावून परतणाऱ्या होमगार्डांवर अचानक आलेल्या या संकटाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.










0 Comments