ADvt

माजी नगरसेवक राजू डफ यांचे निधन....





माजी नगरसेवक राजू डफ यांचे निधन....

झरी - मुकुटबन मार्गावरील मार्की फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळल्याने खळबळ...

वणी : - सुरज चाटे

     माजी नगरसेवक राजू डफ यांचा मृतदेह झरी - मुकुटबन मार्गावरील मुच्ची (मार्की) फाट्या जवळील परिसरात रस्त्याच्या कडेला आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या कडेला त्यांची दुचाकी सुद्धा पडलेल्या स्थितीत आढळली आहे. त्यावरून त्यांचा अपघात झाल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे. 
     दि. ०४ फेब्रुवारी ला दुपारच्या सुमारास नागरिकांच्या निदर्शनास ही घटना आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
     राजू डफ हे माजी नगरसेवक म्हणून शहरात परिचित होते. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे. पोलिसांकडून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविन्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. 

Post a Comment

0 Comments