वणी शहरात जुगारावर पोलिसांचा धडक कारवाईचा धडाका....
तीन ठिकाणी रेड; वरली मटका साहित्य व ७,०३० रोख सह ८ आरोपी ताब्यात...
वणी :- सुरज चाटे
वणी शहर परिसरात दि. २७ जानेवारी २०२६ रोजी जुगार कायद्याअंतर्गत पोलिसांनी धडक कारवाई करत वरली मटका जुगारावर मोठी रेड टाकली. या कारवाईत तीन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे नोंदवून एकूण ८ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून वरली मटका साहित्य व ₹७,०३० रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पहिली कारवाई भाजी मंडी परिसरात करण्यात आली. या कारवाईत वरली मटका साहित्य व ३,४१० रोख रक्कम मिळून आली. याप्रकरणी विशाल मुरलीधर कोटडे (४५), शंकर श्रीराम ठमके (४९) व समीर कुंभकर्ण विश्वकर्मा (१९) सर्व रा. वणी, यांना ताब्यात घेण्यात आले.
दुसरी कारवाई दिपक चौपाटी परिसरात करण्यात आली. या ठिकाणी वरली मटका साहित्य व ३,२६० रोख रक्कम जप्त करण्यात आली. यामध्ये आकाश सुरेश मोहीतकर (२२) रा. रंगनाथ नगर, वणी, मिथुन मेघश्याम पोटे (३३) रा. वणी तसेच मटका चालक शेख आरिफुल रेहमान, रा. सिंधी कॉलनी, वणी यांच्यावर कारवाई करण्यात आली.
तिसरी कारवाईत वरली मटका साहित्य व ३६० रोख रक्कम जप्त झाली. यामध्ये मगेन्द्रा दुरई स्वामी (२१) रा. वार्ड क्रमांक ९, घुग्गुस, ता. घुग्गुस जि. चंद्रपूर आणि फईमुद्दीन ताजुद्दीन शेख, रा. वणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक अंकुश वडतकर, विजय वानखडे, प्रदीप कवरासे, प्रदीप ठाकरे तसेच सुनील नलगंटीवार यांनी यशस्वीपणे पार पाडली. वणी शहरात बेकायदेशीर जुगाराविरुद्ध पोलिसांची ही कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.








0 Comments