निधी आपल्या निकट” कार्यक्रमाचे आयोजन...
27 जानेवारीला रॉकवेल मिनरल्स सभागृहात उपक्रम..
ई. पी. एफ. ओ. कडून थेट संवाद, तक्रार निवारण व जनजागृती सत्र...
वणी :- सुरज चाटे
कामगार मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ई. पी. एफ. ओ.) यांच्या वतीने “निधी आपल्या निकट – विस्तार व बळकटीकरण” या महत्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन रॉकवेल मिनरल्स भालर तर्फे येथीलच सभागृहात करण्यात येत आहे.
हा कार्यक्रम मंगळवार, 27 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजता भालर रोडवरील रॉकवेल मिनरल्स यांच्या सभागृहात होणार आहे. मुख्यालयाकडून प्राप्त निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात कामगार, नियोक्ता तसेच इतर हितधारकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. यावेळी भविष्य निर्वाह निधीशी संबंधित अडचणी, प्रलंबित तक्रारींचे तात्काळ निराकरण, तसेच ई. पी. एफ. ओ. च्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
“निधी आपल्या निकट” या उपक्रमामुळे ई. पी. एफ. ओ. च्या सेवा अधिक लोकाभिमुख होणार असून, स्थानिक स्तरावरच नागरिकांच्या समस्या मार्गी लागणार आहेत. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ई. पी. एफ. ओ. प्रशासनाकडून तथा सूर्या सेम चे एच आर हेड हुसैन भाषा यांनी केले आहे.








0 Comments