जिल्हा परिषद रणांगणात नवे समीकरण?
अब्दुल अजीज सिद्दीकी यांची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी तयारी; राजुर–चिखलगाव–गणातून संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत
सत्यभाषा वणी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल अजीज सिद्दीकी यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राजुर–चिखलगाव–गणातून जिल्हा परिषद गटातून संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे येत असून, स्थानिक पातळीवर त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव, सर्वसामान्य जनतेशी असलेला थेट संपर्क तसेच सामाजिक प्रश्नांवर सातत्याने घेतलेली भूमिका यामुळे सिद्दीकी यांची ओळख वेगळी आहे. युवक, अल्पसंख्याक व सर्वसामान्य मतदारांमध्ये त्यांची मजबूत पकड असून, त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे या गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अब्दुल अजीज सिद्दीकी यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सध्या राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू ठरत आहे.








0 Comments