पुनवट येथे ‘स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ’ संगीतमय एकपात्री नाट्यप्रयोग...
जिजाऊंच्या मुखातून शिवचरित्राचा वीररसपूर्ण जागर; १० जानेवारीला भव्य सादरीकरण...
वणी :- सुरज चाटे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीची प्रेरणा देणाऱ्या ‘स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ’ या संगीतमय एकपात्री नाट्यप्रयोगाचे भव्य सादरीकरण दि. १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता पुनवटच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.
या प्रभावी नाट्यप्रयोगाचे सादरीकरण माननीय सौ. चैताली विजय खटी करणार असून, त्यांनी आजवर राष्ट्रीय स्तरावर ३५५० हून अधिक प्रयोग सादर केले आहेत. दूरदर्शनवरही त्यांची मुलाखत प्रसारित झाली असून, त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली आहे.
या नाट्यप्रयोगातून साक्षात जिजाबाईंच्या मुखातून शिवचरित्राचे वीररसपूर्ण दर्शन घडणार आहे. अस्थिरतेच्या काळात महाराजांनी असुरी प्रवृत्तीचा नायनाट करून देव, देश व धर्मासाठी कसे स्वराज्य उभे केले, याचे प्रभावी चित्रण या प्रयोगात पाहायला मिळणार आहे. नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारा हा कार्यक्रम मोठ्या संख्येने अनुभवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन भाऊराव पा. मोवाडे, महादेव पा. पिदुरकर, आबाजी पा. वाबिटकर तसेच ग्रामपंचायत पुनवट यांच्या वतीने करण्यात आले आहे.








0 Comments