वणीत ‘महाएल्गार’ शेतकरी मेळावा गाजला...
बच्चू कडूंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल; ३० जूनपर्यंत कर्जमाफी नाही तर १ जुलैला एकही रेल्वे चालू देणार नाही” असा इशारा....
वणी :- सुरज चाटे
वणी शहरातील शासकीय मैदानावर दि. ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता आयोजित भव्य शेतकरी महाएल्गार मेळाव्याला शेतकरी, कष्टकरी व ग्रामीण जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात माजी मंत्री बच्चू कडू, ज्येष्ठ शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
मेळाव्यात बोलताना बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. “शेतकरी तयार असेल तर जीव गेला तरी चालेल… शेतकरी सगळ्यांचे बाप आहे, हे लक्षात ठेवा,” अशा आक्रमक शब्दांत त्यांनी भूमिका मांडली. आजही पूर्ण दिव्यांगांना सरकार पगार देत नसल्याचा आरोप करत, शेतकरी व शेतमजुरांनी लढ्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी स्पष्ट केले की, शेतकरी, शेतमजूर व दिव्यांगांच्या हक्कासाठी लढताना आपल्यावर तब्बल ३५० गुन्हे दाखल झाले आहेत. सरकारने आश्वासन दिल्या प्रमाणे “३० जूनपर्यंत कर्जमाफी झाली नाही तर १ जुलै 2026 ला राज्यात एकही रेल्वेचाक फिरू देणार नाही,” असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
या मेळाव्यास ॲड. वामनराव चटप, राजन क्षिरसागर, अनिल हेपट, सतीश पाटील देरकर, दीपक चटप, विजय निवल, देवराव धांडे, अरुण नवले, हेमंत इसनकर, दशरथ पाटील बोबडे, मोबिन शेख, राजू भोंगळे आदी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनेचे सतीश देरकर, अनिल घाटे, देवराव धांडे, दशरथ पाटील बोबडे, अनिल भाऊ गोवारदिपे, तसेच प्रहार संघटनेचे मोबिनभाई शेख व रघुवीर कारेकर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप गोहोकार यांनी केले तर आभार प्रदर्शन मोबिन शेख यांनी केले.











0 Comments