ADvt

वाढत्या प्रदूषणाने वणीसह परिसरातील जनता त्रस्त.....वणी :- सुरज चाटे
     दिवसेंदिवस वाढते वायु प्रदूषण पाहता वणी सह परिसरातील जनता त्रस्त झाली असून कोळसा सायडिंग, कंपन्यांतील धुळ, नादुरुस्त रस्ते आणि रस्त्यावर असलेली धुळ आणि ये जा करणारी वाहने यामुळे उळणारी धूळ रोडवरील दुकान चालकांची डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे दरम्यान संबंधित विभागाने यावर तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 
     वणी सह परिसरात मोठं मोठ्या कोळसा खाणी आहेत, तसेच वणीला ब्लॅक डायमंड सिटी म्हणून सुद्धा नावलौकिक आहे. परिसरात अवती भवती असलेल्या मोठं मोठ्या कंपन्या, कोळसा सायडिंग, कोल वाशरी आदींमुळे परीसरात मोठे प्रदूषण पसरत असुन यामुळे येथील ये जा करणाऱ्यावर व नागरिकांवर मात्र विपरीत परिणाम होतांना दिसत आहे. त्यांना प्रदूषणामुळे विविध आजारांचा वेढा बसत असून याकडे जातीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असुन संबंधित विभागाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष घालून याकडे लक्ष देऊन कसे प्रदूषण कमी करता येईल? या दिशेने पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. 

टँकरने मुख्य रस्त्यावर पाणी फवारणी केल्यास त्रास होऊ शकते कमी?.....
     वाढते प्रदूषण रस्त्यावरील वाहनांची गर्दी आणि त्या धुळीमुळे होत असलेला त्रास या सर्व बाबी लक्षात घेता वणीच्या मुख्य मार्गावरून टँकरने पाण्याची फवारणी केल्यास धुळेवाटे हवेत पसरणारे रस्त्यावरील प्रदूषण काही प्रमाणात का होईना कमी होणार असल्याचे बोलल्या जाते. 

Post a Comment

0 Comments