ADvt

स्वतःला मुलगी बघण्याकरिता निघालेल्या प्रविनचा अपघातात मृत्यू




भयावह अपघातात दोघांचा मृत्यू :- ट्रक ने दिली दुचाकीला धडक...

चंद्रपूर (मुल) :- मनीष रक्षमवार

    मूल शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नागाळा जवळ दुचाकी आणि ट्रक च्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना दिनांक 04 जानेवारी 2023 ला सायंकाळी 6 वाजताचे दरम्यान घडली.मनोहर दसरु मंचलवार वय 60 राहणार मामला बोर्डा, प्रवीण श्रावण मंचलवार वय 28 रा. मसाळा ता. चंद्रपूर असे मृतकाचे नाव आहे.
      मनोहर दसरू मंचलवार आणि प्रवीण श्रावण मंचलवार हे दोघे जण प्रविणला लग्ना करिता मुलगी बघण्या साठी  आपल्या दुचाकी क्रमांक MH 34 AY 7541 ने जात होते. चंद्रपूर मूल मार्गे जात असताना नागाळा जवळ मागच्या बाजूने भरधाव वेगाने येत असणाऱ्या एका ट्रॅक ने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. मृतकाना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदना करीता आणले. पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments