ADvt

वरली मटक्यावर वणी पोलिसांची धाडवणी:- सुरज चाटे
वणीत सुरू असलेल्या वरली मटक्यावर दिनांक 03 जानेवारी 2023 ला रात्री 8 वाजुन 20 मिनीटांनी वणी पोलिसांनी धाड मारली असता अंदाजे साडेचौदा हजाराच्या मुद्देमलासह तिघांना अटक करण्यात वणी पोलिसांना यश आले.
     दिनांक ०३ / ०१ / २०२३ रोजी पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर पोलीस स्टेशन वणी यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून गोयल कापड दुकान ते नगर पालीका कार्यालय वणी चे मधल्या गल्लीत सार्वजनिक ठिकाणी जंगार रेड केला असता जुगार खेळविणारे दोन इसम  नामे १ ) अनीस शेख हमीद शेख वय २७ वर्ष रा. पंचशिल नगर व २) अहजद अली रज्जाक अली बेग वय ५५ वर्षे रा. दिपक चौपाटी वर्णी व वरली मटका खायवाल ३) आसिद खान अजरउल्ला खान वय ३३ वर्ष रा. गुरूनगर वणी हे जागीच मिळुन आले त्यांचे जवळुन वरली मटका साहित्य व नगदी रु १४,४५०/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला.
     सदरची कार्यवाही मा.डॉ. पवन बंसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अपर पोलीस अधीक यवतमाळ, मा. संजय पुज्जलवार उप.वि.पो.अ. वणी, यांचे मार्गदर्शनात पो.नि प्रदिप शिरस्कर यांचे आदेशावरून सपोनि नात शिंदे व पथकांने केली.

Post a Comment

0 Comments