ADvt

मा. आमदार विश्वासभाऊ नांदेकर जगाच्या पडद्या आड...




कळवट कट्टर शिवसैनिक मा. आमदार विश्वासभाऊ नांदेकर जगाच्या पडद्या आड... 

वणी विधानसभा क्षेत्रावर शोककळा...

मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन...

वणी  :- सुरज चाटे 

     वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा ज्येष्ठ राजकीय नेते मा. आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांचे दि. २१ डिसेंबर रोजी रात्री ठीक ११ वाजून ५ मिनिटांनी मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वणी तालुक्यासह संपूर्ण राजकीय, सामाजिक व सार्वजनिक जीवनात हळहळ व्यक्त केली जात आहे.
     गेल्या काही दिवसांपासून आजारपणामुळे त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न देता अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच समर्थक, कार्यकर्ते व नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
     विश्वासभाऊ नांदेकर हे सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडून काम करणारे, संघर्षशील व अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका, कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि जनतेच्या प्रश्नांसाठी केलेली आंदोलने हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होते.
     त्यांच्या निधनावर विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटना, कार्यकर्ते व नागरिकांनी तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. 
     मा. आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या निधनाने वणीने एक अनुभवी, लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे.

Post a Comment

0 Comments