“भाऊ बरे होऊन घरी या…” — वणी विधानसभेची जनता तुमची आतुरतेने वाट पाहतेय...
माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या दीर्घायुष्यासाठी हनुमान चालीसा पठण व होम-हवन..
विक्रांत चचडा यांचे आयोजन...
सत्यभाषा वणी :- वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा जनतेच्या हृदयात स्थान मिळवलेले नेते विश्वास नांदेकर सध्या मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, ते लवकर बरे होऊन जनतेत परत यावेत, यासाठी वणी तालुक्यात सर्वत्र प्रार्थनांचा ओघ सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर युवासेना (शिंदे गट) चंद्रपूर–आर्णी लोकसभा अध्यक्ष विक्रांत चचडा यांच्या नेतृत्वाखाली महाआरती, श्री हनुमान चालीसा पठण , होम-हवनाचे भक्तिमय आयोजन करण्यात आले. “भाऊ बरे होऊन घरी या…” या भावनिक साकड्याने उपस्थितांचे मन हेलावून गेले.
या धार्मिक विधीमध्ये सौ. रोशनी व सोनल पावडर यांनी विधिवत होम-हवन केले. तर महाआरती भाजपा नेते रवी बेलूरकर, उमेश वैरागडे यांनी केली. संपूर्ण वातावरण भक्तीमय, श्रद्धेने ओथंबलेले होते. हनुमान चालीसेच्या मंगल पठणाने परिसरात सकारात्मक ऊर्जा पसरली. विश्वास नांदेकर यांनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला. त्यामुळेच आज त्यांच्या प्रकृतीसाठी संपूर्ण वणी विधानसभा क्षेत्रातील जनता एकजुटीने प्रार्थना करत आहे. “वणीची जनता तुमची वाट पाहते आहे” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
लवकरच ते पूर्णपणे बरे होऊन पुन्हा जनसेवेत रुजू होतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. पूजा झाल्यावर सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. यावेळी भाजपा नेते रवी बेलूरकर, उमेश वैरागडे, सचिन पोहेकर, पायल तोडसाम, शिवराज पेचे, संदीप वाघमारे, प्रसाद ठाकरे, चंद्रकांत घुगुल, निलेश बेलेकर, कुणाल लोणारे, सौरभ खडसे, राजु देवडे, अजू नागपुरे, महेश चौधरी, राजू वाघमारे, विश्वास नांदेकर मित्र परिवार व शिवसैनिक, पदाधिकारी तसेच संपूर्ण शिवसेना महिला आघाडी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.








0 Comments