ADvt

मादगी समाजाचा युवा चेहरा पालिकेत दाखल...



मादगी समाजाचा युवा चेहरा पालिकेत दाखल...

२५ वर्षीय रितिक मामीडवार यांचा दणदणीत विजय :- ५५९ मतांनी काँग्रेसचा पराभव...

वणी :– सुरज चाटे 

    वणी नगर परिषद निवडणुकीत मादगी समाजाचे सुपुत्र आणि अत्यंत कमी वयाचे २५ वर्षीय रितिक लक्ष्मण मामीडवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने ऐतिहासिक विजय नोंदवत नगरसेवक पदावर झेप घेतली आहे. ११४१ मते मिळवत काँग्रेसचे उमेदवार गौतम जीवने यांचा ५८२ मतांनी पराभव करत रितिक मामीडवार यांनी राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे.
     अतिशय गरीब कुटुंबातून संघर्ष करत पुढे आलेल्या रितिक मामीडवार यांची ओळख ही केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक कार्यकर्ती म्हणून अधिक ठळक आहे. जनतेशी असलेली त्यांची थेट नाळ, नेहमीच गोर-गरीब, कष्टकरी जनतेत राहून केलेली सेवा आणि समाजकारणाला दिलेले प्राधान्य यामुळेच हा विजय शक्य झाला, अशी भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
     राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक भर देणारा हा युवा नेतृत्वाचा चेहरा म्हणून रितिक मामीडवार यांची ओळख आहे. मादगी समाजाचे उत्कृष्ट व कार्यक्षम पदाधिकारी म्हणून त्यांनी यापूर्वीही समाजात विश्वास संपादन केला होता.
     या निवडणुकीत मादगी समाजाची एकजूट निर्णायक ठरली असून, त्या परिसरात ‘किंगमेकर’ची भूमिका मादगी समाजाचे ज्येष्ठ व अनुभवी पदाधिकारी रवी कोमलवार यांनी बजावल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि समाजातील संघटित ताकदीमुळे हा विजय अधिक भक्कम झाला आहे.
     युवा नेतृत्व, सामाजिक जाणिव आणि जनतेचा विश्वास यांच्या जोरावर रितिक मामीडवार यांचा हा विजय वणी नगरपरिषदेच्या राजकारणात नवीन पर्वाची सुरुवात ठरेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments