ADvt

गाडगे बाबा चौकातील संजय कोंडावार यांच्या घरी फिल्मी स्टाईल दरोडा...




गाडगे बाबा चौकातील संजय कोंडावार यांच्या घरी फिल्मी स्टाईल दरोडा...

चाकूच्या धाकावर लुटले :- चौकीदार व घरमालकाला ठेवले बांधून....

वणी :- सुरज चाटे 

     येथीलच गाडगे बाबा चौकातील प्रसिद्ध कोंडावार ज्वेलर्स च्या बाजुला असलेल्या एका घरात दि. ३० ला  पहाटे १.४५ वाजताच्या दरम्यान दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईल दरोडा टाकून सोने व कॅश असे एकुण २० ते २५ लाखाच्या जवळपास ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. 


     मिळालेल्या माहितीनुसार संजय निळकंठराव कोंडावार (७५) हे गाडगे बाबा चौक परिसरात राहत होते. त्यांच्या दुकानाला व घराला एक विलास वाडके (४०) नामक चौकीदार होता. दि. ३० ला पहाटे १.४५ वाजताच्या दरम्यान चार दरोडेखोर आले आणि चौकीदार यांच्याशी झटपट करीत होते. दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. त्यांना धारदार शस्त्र व चाकूचा वार करीत धाक दाखवून त्यांना झोपवून हात, पाय, तोंड बांधुन त्यांच्याकडील असलेल्या सोन्यावर व पैशावर डल्ला मारला. त्यात अंदाजे १२ तोडे सोने व रोख अंदाजे साडेचार लाख कॅश असा एकूण २० लाखाच्यावर मुद्देमाल दरोडे खोरानीं लंपास करीत रफुचक्कर झाले. त्यानंतर ते दोघेही कसे बस सुटले. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली, माहिती मिळताच वणी पोलिस, गुन्हे शोध अधिकारी, फॉरेन्सिक पथक घटना स्थळी दाखल झाले आहे.  


     एन निवडणुकीच्या तोंडावर शहरातील मुख्य चौक परिसरात फिल्मी स्टाईल चाकू चा धाक दाखवून दरोडेखोरांनी दरोडा घातल्याने खळबळ उडाली आहे.  पुढील तपास पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments