ADvt

शासकीय जागेवर राहणाऱ्या रहिवाश्यांना पट्टे प्रदान करणार... ना. चंद्रशेखर बावनकुळे..



शासकीय जागेवर राहणाऱ्या रहिवाश्यांना पट्टे प्रदान करणार... ना. चंद्रशेखर बावनकुळे..

लाडक्या बहीणीला अधिक मजबुत करणार :- 100 महिला बचत गटांना 1 लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा

वणीत भाजपा चा दमदार रोड शो...

सत्यभाषा वणी :- नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी जोर धरत असताना भारतीय जनता पक्षातर्फे शनिवार दि. २९ ला भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले दरम्यान या रॅलीत हजारोंचा जनसमुदाय उसळला होता. येथील शासकीय मैदान येथून निघालेल्या रॅलीचा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, खातीचौक, गांधीचौक, गाडगेबाबा चौक, जत्रा रोड, सरोदय चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक असताना परत शासकीय मैदान येथे समारोप झाला. 


     दरम्यान शासकीय मैदान येथे आयोजित भव्य जाहीर सभेला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष रवी बेलुरकर, भाजपचे कामगार नेते विजय पिदुरकर यांनी संबोधित केले. जाहीर सभेत मान्यवरांसह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम तसेच नगरसेवक पदाचे सर्व 29 उमेदवार मंचावर उपस्थित होते.


     जाहीर सभेत भाषण करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनेक विषय मांडून विविध केलेले विकास कामे सांगितली. तसेच सर्वात महत्त्वाचा विषय असलेल्या शासकीय जागेवर राहणाऱ्या रहिवाश्यांना पट्टे प्रदान करणार असे आश्वासन दिले.


      वणीच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असा शब्द दिला. यात लाडकी बहीण योजनले आणखी मजबूत करण्याचा संकल्प, वणीतील 100 महिला बचत गटांना 1 लाख रुपये अनुदान देण्याची घोषणा, शेतकऱ्याचे 27 हजार कोटीची कर्जमाफी, गरीब शेतकऱ्यांचे कर्ज माफ, 15 ऑक्टोबर 2024 पूर्वीच्या सर्व जमीन मालकांना प्रॉपर्टी कार्ड देऊन अधिकृत करण्यात येईल. शासकीय जागेवर राहणाऱ्या रहिवाश्यांना पट्टे देण्याचा निर्णय 40 वर्षापासून झुडपी जंगल जागेवर बसलेल्या नागरिकांना पट्टे वितरण, शेतात जाणारे सर्व पांदण रस्ते बांधण्याचा निर्णय, विद्यार्थ्यांना लागणारे सर प्रकारच्या डॉक्युमेंट्स वर स्टॅम्प पेपरची बाध्यता समाप्त, महसूल खात्याकडून वणी शहराचा ड्रॉनद्वारे सर्वेक्षण, व मोजणी करण्यात येणार असल्याची घोषणा केली. 


     धीरज भोयर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष मयूर गेडाम यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला. 


     भव्य रॅली व जाहीर सभेत भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शेतकरी नेते दिनकरराव पावडे, कामगार नेते विजय पिदुरकर, शहर अध्यक्ष ऍड निलेश चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे, रवी बेलुरकर, अंकुश बोडे, गजानन विधाते, प्रा. महादेव खाडे, प्रदीप जेऊरकर, मीरा पोतराजे, अविनाश लांबट, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या खेमराज आत्राम तसेच भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक पदाचे उमेदवार कार्यकर्ते व मोठा जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments