वणीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आज भव्य जाहीर सभा
भव्य रॅलीचे आयोजन; भाजपा एकजुटीने विजयासाठी सज्ज
सत्यभाषा वणी :– वणी नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची प्रचार मोहीम शिगेला पोहोचली असून मतदारांमध्ये भाजपा बद्दल मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्मित झाले आहे. घरोघरी मिळत असलेल्या प्रतिसादामुळे भाजपाच्या विजयाचा आत्मविश्वास अधिक दृढ होत आहे. प्रभाग निहाय उमेदवारांच्या पाठीशी मतदार ठामपणे उभे असल्याचे चित्र दिसते.
आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत वणी येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा शासकीय मैदान, पाण्याची टाकी जवळ, वणी येथे पार पडणार असून, भाजपच्या विजयाचा मंत्र देत मंत्री बावनकुळे वणीच्या जनतेशी संवाद साधणार आहेत.
ना. बावनकुळे हे विकासाभिमुख निर्णयक्षम नेतृत्वासाठी ओळखले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशात अनेक विकासकामांना गती मिळाली असून वणीसह परिसरात विकासाची नवी दिशा निर्माण झाली आहे.
वणी नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम या लोकप्रिय उमेदवार म्हणून पुढे येत असून ‘कमळ’ चिन्हाला दिवसेंदिवस मिळणारे समर्थन लक्षणीयरीत्या वाढत आहे. भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने प्रचारात झोकून देत असून “विकसित वणी”च्या दिशेने ठोस योजना मांडत आहेत. उरलेल्या प्रलंबित कामांना वेग देणे, नव्या विकास प्रकल्पांची अंमलबजावणी, स्वच्छ व स्मार्ट वणी निर्माण करण्याच्या दृष्टीने भाजपने आखलेली रणनीती मतदारांना भावत आहे. महिलां पासून युवकांपर्यंत सर्वच स्तरात भाजपाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळताना दिसत आहे.
सध्याच्या जनतेच्या प्रतिसादावरून भाजपाच्या विजयाची लाट आणखी प्रबळ होत असून, स्थिर नेतृत्व, सुशासन व विकासाच्या आधारावर वणी नगरपरिषदेत पुन्हा एकदा भगवा फडकणार असे वणी करांकडून बोलल्या जात आहे. मोठ्या संख्येने या भव्य रॅली ला व सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा कडून करण्यात आले आहे.











0 Comments