ADvt

वणीचा अभिमान – राष्ट्रीय पातळीवर नव्या (गौरी)ची धमाकेदार एन्ट्री...



वणीचा अभिमान – राष्ट्रीय पातळीवर नव्या (गौरी)ची धमाकेदार एन्ट्री...

कबड्डीच्या मैदानात नव्या हिने मारला विदर्भ संघात विजयाचा झुंजार डाव…

सत्यभाषा वणी :-- वणीच्या क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावी अशी कामगिरी करत शहरातील कु. नव्या ऊर्फ गौरी श्रीराम पिदुरकर हिची सोनीपत (हरियाणा) येथे होणाऱ्या ३५व्या सब-ज्युनिअर नॅशनल लेव्हल महिला कबड्डी स्पर्धेसाठी विदर्भ संघात तिची निवड झाली आहे. या भव्य यशामुळे वणीचे नाव राज्यभरात अधिक उजळले असून नव्या हिने घेतलेली ही गगनभरारी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

   
  
    नव्याच्या या राष्ट्रीय निवडीमागे तिची जिद्द, श्रम आणि कटाक्ष मेहनत तर आहेच, पण याचबरोबर कुणाल विशाल ठोंबरे (नृसिंह स्पोर्टिंग क्लब, वणी) यांचे विशेष मार्गदर्शनही तिच्या यशाचा मजबूत पाया ठरला. कठोर सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि योग्य तांत्रिक मार्गदर्शनामुळे नव्याने राष्ट्रीय स्तरावर आपली भक्कम छाप उमटवली.


   तिच्या क्रीडा प्रवासात श्रद्धा देशमुख, पल्लवी ठाकरे, हिमांशी कावडे, रेवती ताजने, पलक पाचभाई, मोहिनी खारकर, जान्हवी ठाकरे यांनीही प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि सहकार्याचा हात दिला आहे. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच नव्याचे स्वप्न साकार झाले आहे.


     नव्या च्या निवडीमुळे वणीच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक, खेळाडू आणि क्रीडा प्रेमींकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून राष्ट्रीय स्पर्धेत तिची दमदार कामगिरी पाहण्याची उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळते आहे.

Post a Comment

0 Comments