ADvt

प्रभाग क्र. 14 मधील जागा ‘क’ ची निवडणूक पुढे ढकलली



प्रभाग क्र. 14 मधील जागा ‘क’ ची निवडणूक पुढे ढकलली

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वणीतील निर्णय — इतर सर्व निवडणुका नियोजित वेळेनुसारच

वणी :- सुरज चाटे 

     राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी 29 नोव्हेंबर 2025 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, ज्या नगरपालिका प्रभागांमध्ये कोणत्याही जागेबाबत न्यायालयीन अपील प्रलंबित होते आणि त्यावर नुकताच निकाल लागलेला आहे, अशा प्रभागातील उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज मागे घेण्यासाठी पुरेसा व वाजवी वेळ मिळावा यासाठी त्या जागांची निवडणूक तात्पुरती पुढे ढकलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


     या आदेशांची अंमलबजावणी करत वणी नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 14 मधील जागा ‘क’ यावरील निवडणूक तात्पुरती पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद निवडणुक वणी तथा उपविभागीय अधिकारी, वणी यांनी प्रेस नोट द्वारे दिली आहे.


    दरम्यान, नगराध्यक्ष पदाची निवडणूक, तसेच प्रभाग क्रमांक 1 ते 13 आणि प्रभाग 14 मधील जागा ‘अ’ व ‘ब’ यांच्या निवडणुका मात्र पूर्वनिश्चित दिनांक, वेळ आणि ठिकाणानुसार पूर्ववत पार पडणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Post a Comment

0 Comments