जाहीर, कॉर्नर सभेतील व घरा घरातील जनतेचा भाजपाला उत्कृष्ट प्रतिसाद....
सत्यभाषा वणी :– वणी नगरपरिषद निवडणूक 2025 चा प्रचार आज अंतिम टप्प्यात पोहोचला असून गेल्या काही दिवसांत भारतीय जनता पक्षाने प्रभाग 1 ते 14 पर्यंत घरोघरी भक्कम संपर्क साधला आहे. प्रत्येक घरात, प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक भागात भाजपा उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटित उपस्थिती दिसून आली.
प्रचाराच्या प्रारंभीपासूनच जाहीर सभा, कॉर्नर सभा तसेच घराघरातील भेटीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पक्षाला मिळत आहे. विकासकामे, संघटनशक्ती आणि नेतृत्वाचा ठाम विश्वास या बळावर मतदार भाजपा उमेदवारांच्या पाठिशी उभे असल्याची भावना स्पष्टपणे जाणवली.
स्थानिक नागरिकांमध्ये “या वेळी वणीत कमळ फुलणारच” असा आत्मविश्वास पाहायला मिळत असून, विविध भागात झालेल्या सभा व संपर्क मोहिमेतही याची प्रचिती आली आहे. शेवटच्या टप्प्यात प्रचाराला मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता भाजपा उमेदवारांना विजयाची आशा आणखी दृढ झाल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.
वणी निवडणुकीत भाजपाचा प्रभावशाली झंकार आणि जनतेचा ठाम विश्वास हा यंदाच्या मोहिमेचा वैशिष्ट्यपूर्ण ठसा ठरत आहे.











0 Comments