प्रभाग १३ चे उमेदवार धर्मेंद्र काकडे यांची विजयाकडे वाटचाल...
सदैव जनसेवेचा ध्यास – सर्वांगीण विकासाचे आश्वासक नेतृत्व
सत्यभाषा वणी :– प्रभाग क्रमांक १३ (ब) मध्ये शिवसेना (शिंदे गट) चे अधिकृत उमेदवार धर्मेंद्र काकडे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून, नागरिकांकडून मिळत असलेल्या उल्लेखनीय प्रतिसादामुळे काकडे यांची गती दिवसेंदिवस अधिक वेगवान होताना दिसत आहे.
स्थानिक प्रश्नांवर थेट काम करणारे, सरळ व सर्वांना सहज उपलब्ध राहणारे उमेदवार म्हणून काकडे यांची ओळख आहे. विद्यार्थ्यांना स्टडीसेंटर व सर्वगुण संपन्न असा प्रभाग बनविण्याचा निर्धार करत आणि उच्च विचारसरणीमुळे रंगनाथ नगर, शास्त्री नगर तसेच संपूर्ण प्रभागातील मतदार त्यांना ‘आपला माणूस’ म्हणून पाहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
प्रभागाचा सर्वांगीण विकास, रस्ते–नाली कामांची गती, स्वच्छता, दिवाबत्ती, युवकांसाठी संधी, तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर तत्पर प्रतिसाद देण्याची त्यांची भूमिका अनेकांना भावली आहे. प्रचारादरम्यान काकडे यांनी घराघरांत जाऊन जनसंपर्क साधत लोकांना आपले भविष्य वेगाने बदलण्यास सक्षम अशी भूमिका मांडली आहे.
स्थानिक नागरिकांचा ठोस पाठिंबा आणि वाढता उत्साह पाहता धर्मेंद्र काकडे यांच्याबाबत विजयाची वाट अधिक स्पष्ट होत असल्याचे राजकीय वर्तुळातही चर्चेत आहे.








0 Comments