ADvt

वणी नगरपरिषद निवडणुकीत भाजपाची ‘पार्लमेंट ते पंचायत’ एकसंघ शासनाची संकल्पना चर्चेत


वणी नगरपरिषद निवडणुकीत भाजपाची ‘पार्लमेंट ते पंचायत’ एकसंघ शासनाची संकल्पना चर्चेत

पहा काय आहे ही संकल्पना....

सत्यभाषा वणी :- नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात ‘पार्लमेंट ते पंचायत’ या एकसंघ शासनाच्या संकल्पने विषयी चर्चा रंगू लागली आहे. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकाच पक्षाचे सरकार असल्यास निर्णय प्रक्रिया गतिमान होते, निधी उपलब्धतेला वेग येतो आणि विकासकामांना अडथळे निर्माण न होण्याचे मत व्यक्त करण्यात आले.


केंद्रातील कार्यकाळामुळे विकासाला चालना..
     केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे राष्ट्रीय महामार्ग, प्रधानमंत्री आवास योजना, जल जीवन मिशन अशा अनेक प्रकल्पांना गती मिळाल्याचा दावा करण्यात आला. स्थिर नेतृत्वामुळे देशभरात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात विक्रमी कामे झाले.  


राज्यात डबल इंजिनच्या संकल्पनेला गती
     राज्यात भाजपा–महायुती सरकार असल्याने विकासात्मक निर्णयांना गती मिळाल्याचेही सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रगतिपथावरील योजनांना वेग आला आहे.


वणीतील स्थानिक नेतृत्वाचा उल्लेख
       वणी शहरात संजीवरेड्डी बोदकुरवार आणि तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वामुळे गेल्या काही वर्षांत अनेक कामांना चालना मिळाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. निधी उपलब्धता, दीर्घकालीन दृष्टी आणि सक्षम समन्वय यामुळे प्रकल्प पूर्णत्वास गेले.


नगरपालिका पातळीवरील ‘एकविचाराचे’ शासन आवश्यक?
        केंद्र आणि राज्यात एकसंघ धोरण असूनही नगरपालिकेत विविध पक्षांमुळे निर्णय प्रक्रियेत विलंब होतो, प्रभागांमध्ये वेगवेगळ्या राजकीय गणितांमुळे कामे अडकत असल्याचा आरोपही करण्यात येतो.

‘ट्रिपल इंजिन’ सरकारची मागणी
  भाजपच्या निवेदनानुसार अध्यक्ष आणि नगरसेवक पदावर देखील एकविचाराचे नेतृत्व आल्यास –

🌟 मंजुरींचा वेग वाढेल
🌟 विकासकामांसाठी निधी सहज मिळेल
🌟 मोठे प्रकल्प गतीने पूर्ण होतील

शहराचा मेगा डेव्हलपमेंट प्लॅन पुढे सरकेल
     वणी शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्थिर, पारदर्शक आणि लोकाभिमुख सुशासनाची गरज असल्याचे मतही एका प्रसिद्धी पत्रकातून भाजपा कडून  व्यक्त करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments