ADvt

सेवा, संघटन आणि विकासाचा एक वर्षाचा यशस्वी प्रवास...



सेवा, संघटन आणि विकासाचा एक वर्षाचा यशस्वी प्रवास...

वणी शहर भाजपच्या नेतृत्वाची नवी ओळख; ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी यांच्या कार्यकाळात संघटन विस्तारासह जनसेवेचा धडाका...


सत्यभाषा न्युज वणी :-  भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक वाटचालीत वणी शहरात गेल्या एका वर्षात एक नवे पर्व सुरू झाले आहे. सेवा, समर्पण, संघटन आणि विकास या चार सूत्रांना केंद्रस्थानी ठेवून भारतीय जनता पार्टी वणी शहराचे अध्यक्ष ॲड. निलेश माया महादेव चौधरी यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण केली आहे.


     दि. २८ जून २०२५ रोजी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे तसेच जिल्हाध्यक्ष अँड. प्रफुलजी चव्हाण यांच्या विश्वासातून अँड. निलेश चौधरी यांची वणी शहर भाजप अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कोणतीही मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना मिळालेली ही जबाबदारी त्यांनी संघटन कौशल्य, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांच्या बळावर प्रभावीपणे पेलली.

संघटन विस्ताराला दिली नवी दिशा
     शहराध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पक्ष संघटना अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक करण्यावर भर दिला. विविध समाजघटक, युवा, महिला, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि उच्चशिक्षित नागरिकांना पक्षाच्या प्रवाहात जोडण्याचे काम केले. दि. २१ जुलै २०२५ रोजी सर्वसमावेशक शहर कार्यकारिणीची घोषणा करून त्यांनी प्रत्येक घटकाला संघटनेत स्थान दिले. प्रभागनिहाय कार्यकर्त्यांची साखळी निर्माण करत नियमित बैठका, प्रशिक्षण वर्ग, युवा व महिला मोर्चाच्या माध्यमातून पक्ष कार्याला अधिक गती दिली.



नगरपरिषद निवडणुकीत रणनीतीचे यश
     ॲड. निलेश चौधरी यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठे राजकीय यश म्हणजे वणी नगरपरिषद निवडणुकीतील प्रभावी नियोजन. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ स्तरापासून शहरस्तरा पर्यंत मजबूत यंत्रणा उभी करण्यात आली. मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क, विविध समाजघटकांमध्ये निर्माण केलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांचे नियोजनबद्ध काम यामुळे भारतीय जनता पार्टीला नगरपरिषद निवडणुकीत मोठे यश मिळाले. त्यानंतर नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पदग्रहण सोहळ्याचे यशस्वी आयोजन करून संघटनात्मक ताकद दाखवून दिली.

जनसेवेला प्राधान्य; आरोग्य व सामाजिक उपक्रमांचा विस्तार
     राजकारणासोबत समाजसेवेचा ध्यास घेत त्यांनी वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले. मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर, महाआरोग्य शिबिर, नमो नेत्र संजीवनी अभियान तसेच आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळवून दिला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बसस्थानक व शासकीय रुग्णालय परिसर स्वच्छता मोहीम, विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचे निराकरण, पर्यावरण संवर्धनासाठी एक पेड माँ के नाम वृक्षारोपण अभियान अशा विविध उपक्रमांनी सामाजिक बांधिलकी जपली.

सांस्कृतिक आणि राष्ट्रहिताच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग
     शहरातील सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरांना जपत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिरपूर कावड यात्रेतील सहभाग, पोळा उत्सव सजावट स्पर्धा, गणेशोत्सवातील "बाप्पा माझा" स्पर्धा, धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले. क्रांती दिन तिरंगा रॅली, स्वातंत्र्य दिन, भाजप स्थापना दिवस, "मन की बात" कार्यक्रम, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी कार्यक्रम, जागतिक योग दिन, आणीबाणीच्या ५० वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम अशा विविध माध्यमातून राष्ट्रप्रेम आणि जनजागृतीचा संदेश देण्यात आला. रक्षाबंधना निमित्त मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना ५ हजार राख्या पाठविण्याचा उपक्रम, नमो युवा रन मॅरेथॉन, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध व रांगोळी स्पर्धा, व्यापारी संमेलन आणि महिला सक्षमीकरणासाठी नारीशक्ती जनजागृती रॅली यामुळे सर्व स्तरातील नागरिकांशी संवाद वाढविण्यात आला.


नेतृत्वाशी समन्वयातून विकासाला चालना
     पक्षाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री मा. अशोक उईके, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री मा. हंसराज अहिर, माजी मंत्री मदनभाऊ येरावार, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे तसेच जिल्हा व प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले.

जनतेच्या विश्वासाला न्याय देणारे नेतृत्व
     दि. २८ जून २०२५ ते २८ जून २०२६ हा कालखंड वणी शहर भाजपसाठी संघटन विस्तार, जनसेवा आणि विकासाभिमुख कार्याचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
     ॲड. निलेश माया महादेव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ताकद वाढली असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहणारे, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे आणि जनतेशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
     सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या विचाराने प्रेरित होऊन वणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची पुढील वाटचाल अधिक प्रभावी ठरो, अशी अपेक्षा वणीकरांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments