ADvt

पालकमंत्री संजय राठोड यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेचा पर्यावरण व शिक्षणपूरक उपक्रम



वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीचा संदेश; वणीत ५६ वृक्षांचे रोपण आणि विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप...

पालकमंत्री संजय राठोड यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेचा पर्यावरण व शिक्षणपूरक उपक्रम; समाजहिताचा आदर्श घालून दिला...

सत्यभाषा वणी :- शिवसेना नेते तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त शिंदे युवा सेना, वणीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम राबविण्यात आला. राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय, वणी येथे ५६ वृक्षांचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच लालगुडा जिल्हा परिषद शाळेसह विविध शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तकांचे वाटप करून ज्ञानदानाचा उपक्रमही राबविण्यात आला.


      या उपक्रमाचे आयोजन युवा सेना लोकसभा अध्यक्ष विक्रांत चचडा यांनी केले. शिवसेना नेते आशिषभाऊ खुलसंगे व तालुकाप्रमुख प्रसादभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात खेमराज महाराज (पिपरीवाले) यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली.
     यावेळी विक्रांत चचडा यांनी सांगितले की, "आशिषभाऊ खुलसंगे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबवून समाजहिताची चळवळ अधिक बळकट करण्यात येईल."


     या प्रसंगी युवा सेना वणी विधानसभा प्रमुख युवराज ठाकरे, युवा सेना शहर प्रमुख हिमांशू बोहरा, कुणाल लोणारे, सौरभ खडसे, अनुप चटप, गौरव मडावी यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छांचा सोहळा न करता वृक्षारोपणातून पर्यावरण संरक्षणाचा आणि पुस्तक वाटपातून शिक्षणाचा संदेश देण्यात आला. युवा सेनेचा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला.
     "एक झाड म्हणजे भविष्यातील श्वास आणि एक पुस्तक म्हणजे उज्ज्वल भविष्याचा पाया" या भावनेतून वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

Post a Comment

0 Comments