ADvt

सेवा, समर्पण आणि सहकार्य'चा पाच वर्षांचा सुवर्णप्रवास....



'सेवा, समर्पण आणि सहकार्य'चा पाच वर्षांचा सुवर्णप्रवास.... 

रॉयल फाउंडेशनने समाजसेवेचा उंचावला मानदंड!...

निती आयोगाकडे नोंदणी, 12-A व 80-G प्रमाणपत्रांची मान्यता; सामाजिक, धार्मिक उपक्रमांसह रुग्णसेवेसाठी ॲम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध – सहकाऱ्यांचे मानले ऋण...

सत्यभाषा वणी :-  वणीतील सामाजिक क्षेत्रात अल्पावधीतच उल्लेखनीय कार्याचा ठसा उमटविणाऱ्या रॉयल फाउंडेशन हेल्पिंग हँड्स ग्रुपने यशस्वी वाटचालीची पाच वर्षे पूर्ण केली आहेत. समाजहिताच्या विविध उपक्रमांद्वारे सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या संस्थेने या प्रवासात अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठत समाजविश्वास संपादन केला आहे.


     संस्थेची भारत सरकारच्या निती आयोगाकडे अधिकृत नोंदणी झाली असून, संस्थेला युनिक आयडी प्राप्त झाला आहे. तसेच आयकर विभागाकडून 12-A आणि 80-G प्रमाणपत्रे मिळाल्याने सामाजिक कार्याला अधिक बळ मिळाले आहे.
     मागील पाच वर्षांत रॉयल फाउंडेशनने विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि जनकल्याणकारी उपक्रम राबवत गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने संस्थेने ॲम्ब्युलन्स सेवाही सुरू केली असून, या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.




      संस्थेचे अध्यक्ष ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी यांनी पाच वर्षांचा हा प्रवास सहकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिकांच्या विश्वासामुळेच शक्य झाल्याचे सांगितले. आगामी काळात आणखी व्यापक सामाजिक कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करत, सर्वांनी यापुढेही असेच सहकार्य कायम ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


     "सेवा हीच धर्म, समाजासाठी आज... सक्षम उद्यासाठी आज" हे ब्रीद जपत रॉयल फाउंडेशनने समाजसेवेची उभारलेली ही वाटचाल अनेक सामाजिक संस्थांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Post a Comment

0 Comments